मुसळधार पाऊस त्यात खडकवासलातून विसर्ग अन् पुण्यात पुन्हा पूरस्थिती… जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड

| Updated on: Aug 04, 2024 | 5:41 PM

आज पुन्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. या पाण्याने आणि सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात एकता नगरमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आली होती.

Follow us on

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अशातच मध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता मध्यरात्री पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, आज पुन्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. या पाण्याने आणि सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात एकता नगरमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आली होती. इतकंच नाहीतर प्रशासनाने खबरदारीही बाळगली होती. मात्र तरी धरणातून विसर्ग आणि सुरक्षेसाठी पुण्यात एकता नगरमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. तर एकता नगरच्या सोसायटीतील लोकांना मोठे हाल झाले असून लोकांना बाहेर काढलं जात आहे. एकता नगरमधला वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.