हिरवा गर्द निसर्ग अन् पांढरंशुभ्र धुकं… बदलापूरमधील खंडोबा मंदिराचं विलोभनीय दृश्य, पाहा ड्रोन VIDEO

| Updated on: Aug 01, 2024 | 1:44 PM

बदलापूरच्या मूळगावात वसलेलं खंडोबाच्या मंदिराचं सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे. चहुबाजूला असलेला हिरवागर्द निसर्ग, घनदाट जंगल, बारवी धरण आणि हिरवा शालू पांघरेले डोंगर या निसर्गाच्या त्रिवेणी संगमात बुडालेलं हे खंडोबा मंदिर सध्या पर्यटक आणि निसर्ग प्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडत आहे

बदलापूरच्या जवळील मुळगावाची ओळख तिथल्या खंडोबाच्या मंदिरामुळे आहे. या मूळगावात वसलेलं खंडोबाच्या मंदिराचं सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे. चहुबाजूला असलेला हिरवागर्द निसर्ग, घनदाट जंगल, बारवी धरण आणि हिरवा शालू पांघरेले डोंगर या निसर्गाच्या त्रिवेणी संगमात बुडालेलं हे खंडोबा मंदिर सध्या पर्यटक आणि निसर्ग प्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडत आहे. याच मन मोहून टाकणाऱ्या निसर्गाचं सौंदर्य ड्रोनच्या कॅमेरातून टिपलं आहे. हे ड्रोन शॉट्स सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या दृश्यामध्ये घनदाट जंगलात वसलेलं बारावी धरणाच्या बाजूलाच असलेलं आणि हिरवा शालू नेसलेल्या डोंगरांच्या कुशीत हे मंदिर असल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडताना दिसतेय. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरलं होत आहे.

Published on: Aug 01, 2024 01:44 PM
क्षणार्धात भलीमोठी बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली; कंगनाच्या मतदारसंघातील थरारक VIDEO तुम्ही पाहिला?
‘ताई, माई, अक्का… माझा पक्ष छ#@*’; शिंदे गटाच्या ‘त्या’ मिशनवर संजय राऊतांची वादग्रस्त टीका