राज ठाकरे यांची किन्नर समाजाने घेतली भेट, म्हणाले… आमचा तृतीयपंथी मेला तर…

| Updated on: Aug 07, 2024 | 4:38 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज लातूर जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. या लातूर जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांची लातूरमधील किन्नर समाजाने भेट घेतली. यावेळी किन्नर समाजाने त्यांच्या समस्या राज ठाकरे यांच्या पुढे मांडल्या. दरम्यान, त्या समस्यांवर लवकर मार्ग काढू असे आश्वासनही दिले.

तृतीयपंथीयांनी त्यांच्या विविध समस्या आज राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंनी तृतीयपंथीयांना त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. राज ठाकरे परखड भूमिका घेणारे नेते आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आमचे प्रश्न मांडले. लातूरमध्ये आमचा तृतीयपंथी मेल्यानंतर त्याची मयत करण्यासाठी आंबेजोगाई किंवा तुळजापूरला जावे लागते. लातूर शहर एवढे मोठे असूनही आम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे लातूर शहरात आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी तसेच काही तृतीयपंथीयांना निवारा मिळावा ही मागणी आमच्या समाजाने राज ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे प्रिती माऊली लातूरकर (तृतीयपंथी) यांनी म्हटले. आमच्या समस्या राज ठाकरे यांनी ऐकल्या आणि त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला नक्की खात्री आहे की राज ठाकरे आमचे प्रश्न सोडवतील, असा विश्वासही प्रिती माऊली लातूरकर (तृतीयपंथी) यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 07, 2024 04:38 PM
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत ‘हा’ जिल्हा टॉप 10 मध्ये… बघा तुमचा जिल्हा तर नाही ना?
कोकणातला एकजण भिताडाकडे बघतोय, जरांगेंच्या रॅलीत राणे टार्गेटवर, अप्रत्यक्ष डागलं टीकास्त्र