Kiran Gosavi | आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी पोलिसांना शरण येणार?

| Updated on: Oct 25, 2021 | 4:59 PM

क्रुझ ड्रग्ज पार्टीतील पंच केपी गोसावी ऊर्फ किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, किरण गोसावी हा स्वतःहून पोलिसांना शरण येणार आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टीतील पंच केपी गोसावी ऊर्फ किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाली आहेत. केपी गोसावीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केल्या आहेत. गोसावी हा परराज्यात दडून बसल्याची माहिती असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस परराज्यात रवाना झाली आहेत. गोसावी वारंवार त्याचं लोकेशन बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होती. त्याचे शेवटचे लोकेशन आगरतळा येथील होते. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, किरण गोसावी हा स्वतःहून पोलिसांना शरण येणार आहे.

Published on: Oct 25, 2021 04:30 PM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 25 October 2021
Prabhakar Sail | वानखेडेंविरोधातील सर्व पुरावे पोलिसांना दिले, प्रभाकर साईलच्या वकीलांची माहिती