Kiran Gosavi | किरण गोसावीला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करणार

| Updated on: Oct 28, 2021 | 11:13 AM

आर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई: आर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे गोसावीला जामीन मिळतो की पोलीस कोठडी? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केपी गोसावीला आज सकाळीच अटक केल्यानंतर त्याला आज पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं. पोलीस आयुक्तालयात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती चिन्मय देशमुख प्रकरणातील वकील हर्षल गरुड यांनी सांगितलं.

 

 

Published on: Oct 28, 2021 11:13 AM
KP Gosavi Arrested | ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीला अटक, आज कोर्टात हजर करणार
Dilip Walse Patil Corona Positive | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण