Palghar | किरण गोसावी याला न्यायालयाने सुनावली 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Palghar | किरण गोसावी याला न्यायालयाने सुनावली 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

| Updated on: Dec 02, 2021 | 8:28 PM

पालघरमधील एडवन येथील दोन तरुणांना परदेशात नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणात 420 सह विविध कलमाअंतर्गत केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर : आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल रात्री उशिरा गोसावीला पालघरच्या केळवे पोलिसांनी अटक केली असून पालघर दिवानी न्यायालयासमोर हजर केलं असता सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालघरमधील एडवन येथील दोन तरुणांना परदेशात नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणात 420 सह विविध कलमाअंतर्गत केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन पालघर पोलिसांमोफत करण्यात आलं आहे.

Nana Patole | कॉंग्रेसला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही – नाना पटोले
Special Report | 29 देशांत ओमिक्रॉनचे रुग्ण, भारतात नेमकी काय स्थिती?