Pune | किरण गोसावी सचिन पाटील या बनावट नावाने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता, पोलीस आयुक्तांची माहिती
चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी केपी गोसावी याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. या तीन वर्षात गोसावी कुठे कुठे लपत होता याची क्रोनोलॉजीच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितली.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केपी गोसावीबाबतची माहिती दिली. गोसावीची एक तास कसून चौकशी केल्यानंतर तो कुठे कुठे लपला होता याची माहिती मिळाल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. गोसावी हा पुणे, मुंबई, लोनावळा, जळगाव, उत्तर प्रदेशातील फत्तेपूर, लखनऊ, तेलंगनातील हैदराबाद आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. तो वारंवार लपून बसत होता. त्यामुळे त्याला ट्रेस करणं कठीण जात होतं. मात्र, तो ज्या ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या त्या ठिकाणी आमची टीम गेली होती. त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली होती, असं सांगतानाच आज पहाटे 3 वाजात कात्रजमधील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली, असं गुप्ता यांनी सांगितलं.