‘जरांडेश्वर’ सारखाच जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार; सोमय्यांचे खोतकरांवर गंभीर आरोप
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ज्याप्रमाणे जरांडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबई – भाजपा नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ज्याप्रमाणे जरांडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. खोतकर यांनी मुळे परिवारासोबत हातमीळवनी करून कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा केला, तसेच शरद पवार यांच्या आग्रहाने हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचे देखील सोमय्या यांनी म्हटले आहे.