माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा डाव- किरीट सोमय्या
"ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांचं मनसुख हिरेन करण्याचं षडयंत्रं पोलीस आयुक्त संजय पांडेंसह ठाकरे सरकार करत आहे. ज्याला झेड सुरक्षा असूनही जी व्यवस्था खार पोलीस करत नाही. त्याची माहिती केंद्रीय गृहसचिवांना देणार आहोत," असं सोमय्या यांनी सांगितलं.
भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) जोरदार हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. मी सकाळी केंद्राचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी आणि इतरांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे गृहसचिवांशी बोलत आहेत. ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांचं मनसुख हिरेन करण्याचं षडयंत्रं पोलीस आयुक्त संजय पांडेंसह ठाकरे सरकार करत आहे. ज्याला झेड सुरक्षा असूनही जी व्यवस्था खार पोलीस करत नाही. त्याची माहिती केंद्रीय गृहसचिवांना देणार आहोत, असं सोमय्या यांनी सांगितलं.