Special Report | मविआ सरकार भाजपसाठी किती तोट्याचं?
आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या म्हणाले.