Kirit Somaiya injured : सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांची दगडफेक! हल्ल्यात सोमय्या जखमी, पाहा ग्राऊंड रिपोर्ट

| Updated on: Apr 24, 2022 | 8:16 AM

शनिवारी किरीट सोमय्या यांनाही शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.

मुंबई : शुक्रवारी शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यानंतर शनिवारी किरीट सोमय्या यांनाही शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमीही झाले आहेत. या हल्ल्यांतर किरीट सोमय्यांनी झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाय. शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यावेळी एक दगड किरीट सोमय्या यांच्या गाडीवर भिरकावला गेला. यात गाडीची काच फुटली आणि खिडकीच्या काचा या गाडीत बसलेल्या किरीट सोमय्या यांना लागल्या. त्यात किरीट सोमय्या जखमी झाल्या आहेत.

दिल्लीसह देशात दंगली घडवल्या जात आहेत…
राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? नारायण राणे यांचा शिवसेनेला सवाल