आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ऑलनाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे.
2024मध्ये मोदीच पुन्हा सत्तेत येणार. त्यामुळे संजय राऊत यांच्या बोलण्याला अर्थ नाही. इंडिया बैठक कशी होईल याचीच त्यांना चिंता आहे. बैठका कोण काय देणार यासाठी आहे. काँग्रेसची भूमिकाही दरवेळी बदलत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
"भाजपावाल्यांनी आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये, आम्हाला ती व्यवस्थित करता येते आणि निभावता सुद्धा येते" असं संदीप देशपांडे म्हणाले. 'भाजपाला मुजोर टोल कंत्राटदारांची दलाली करायची आहे का ?', मनसेने थेट मुद्यालाच घातला हात.
तुम्हाला काँट्रॅक्टरला भेटायला वेळ होता. मात्र फक्त आमच्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे आता बोलणं बंद करा, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.
गुणरत्न सदावर्ते यांनी आज शरद पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून शरद पवार यांच्या पॅनलचं ज्या बँकेत वर्चस्व होतं तिथे सदावर्ते यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा तातडीने लागू व्हावा ही आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार लवकरच पाऊल उचलेल अशी आशा आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाऊणतास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची उद्या अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. वरळी मतदारसंघातील निवडणुकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसत आहेत.
शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार, अशी मोठी बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सिंधदुर्ग भवन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, आंबा महोत्सव 2023 चे उद्घाटन झाले. यावेळी नारायण राणे यांनी उद्योजकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र सरकारने अखेर फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेकडून अखेर अधिकृतपणे वगळली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.