Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाची राजकारणातली आयटम गर्ल : Nawab Malik
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. माध्यमांमध्ये बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरूच असतात, असे म्हणत मलिकांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. माध्यमांमध्ये बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरूच असतात, असे म्हणत मलिकांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “चित्रपट चालावा म्हणून जशी आयटम गर्लची गरज लागते. तसेच राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत, असे नवाब मलिक यांनी नांदेड येथे माध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे. किरीट सोमय्यांनी याआधी नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. मला नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ द्यायचंय असं सोमय्या म्हणाले होते.