Kirit Somaiya Dapoli ला होणार रवाना, खेड ते दापोली 100 गाड्यांचा ताफा असणार
भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा चलो दापोली (dapoli) दौरा सुरू झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या रिसॉर्टवर करवाई व्हावी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा चलो दापोली (dapoli) दौरा सुरू झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या रिसॉर्टवर करवाई व्हावी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळीच मुलुंडच्या नीलम नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सोमय्या यांच्यासोबत 100 वाहनांचा ताफा आहे. तब्बल 10 तासांचा प्रवास करून सोमय्या साई रिसॉर्ट येथे पोहोचणार आहेत. सकाळी 7 वाजता सोमय्या नीलम नगरमधून प्रतिकात्मक भला मोठा हातोडा घेऊन निघाले. त्यानंतर साडे आठ वाजता ते ऐरोली पोहोचले. यावेळी त्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. थोड्याच वेळात ते पनवेलला पोहोचणार आहेत. सोमय्यांच्या या दौऱ्याचा घेतलेला हा आढावा.