जनतेला वास्तव कळावं यासाठी कोर्लईला जातोय : किरीट सोमय्या

| Updated on: Feb 18, 2022 | 9:53 AM

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी कोर्लई मध्ये घेतलेल्या जमिनीवरील घरांची पाहणी करण्यास सोमय्या आज जाणार आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे, असं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी कोर्लई मध्ये घेतलेल्या जमिनीवरील घरांची पाहणी करण्यास सोमय्या आज जाणार आहेत. अन्वय नाईक (Anway Naik) यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती.19 बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. मी ज्यावेळी आधी कोर्लई येथे गेलो तेव्हा त्या सरपंच यांनी असाच विरोध केला होता. घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे.ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी कोर्लईला जाणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.