बजरंग खरमाटेच्या संपत्तीची यादी ईडी आणि इन्कम टॅक्सला दिली : किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. बजरंग खरमाटे यानं भ्रष्टाचारानं पैसा कमावला आहे. खरमाटे यांनं त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर अमाप संपत्ती केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. बजरंग खरमाटे यानं भ्रष्टाचारानं पैसा कमावला आहे. खरमाटे यांनं त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर अमाप संपत्ती केली आहे. बजरंग खरमाटे यानं भुगाव येथे भावाच्या नावावर फार्म हाऊस आहे. पुण्यात बजरंग खरमाटे याचे पाच शोरूम आहेत. बारामती मोठं बांधकाम चालू आहे. पुणे शहर, पुणे जिल्हा, सांगली आणि मुंबई येथील 40 संपत्ती यादी आमच्याकडं आली असून ती ईडीला दिली आहे. अनिल परब यांच्या मदतीनं बजरंग खरमाटे यांनी पैसा कमावला आहे. बजरंग खरमाटे याकडे सातशे ते साडे सातशे कोटींची संपत्ती दिसत आहे. खरमाटे यांच्या संपत्तीत कुणाचा किती वाटा याचा शोध लावणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.