Kirit Somaiya | अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला
सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.