58 कोटींचा प्रश्न, किरीट सोमैय्या आधी पत्रकार परिषदेतून उठले, नंतर गाडीची काचच लावली

| Updated on: Apr 07, 2022 | 2:33 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी (ins vikrant) भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत.

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी (ins vikrant) भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत. सोमय्या यांनी आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रश्नी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापूर्वी सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. जरंडेश्वरबाबत सर्व माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राऊतांच्या आरोपांवर विचारलं. आयएनएस विक्रांतचे पैसे कुठे गेले? असा सवाल पत्रकारांनी विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. सोमय्या तडक खुर्चीतून उठले आणि जायला निघाले.

Published on: Apr 07, 2022 02:33 PM
Asawari Joshi यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण
जरंडेश्वरचा हक्क शेतकऱ्यांना कधी मिळणार? शेतकऱ्यांना घेऊन सोमय्या ईडी ऑफिसात