Hasan Mushrif | किरीट सोमय्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, किरीट सोमय्यांनी माफी मागावी : हसन मुश्रीफ
भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर नवा आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे (Santaji Ghorpade) गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे (Appasaheb Nalawade) या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे. दरम्यान किरीट सोमय्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, किरीट सोमय्यांनी माफी मागावी असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.