VIDEO : Kirit Somaiya PC | भुजबळांच्या भ्रष्टाचारावरून पवार-ठाकरेंना चॅलेंज, सोमय्यांची पत्रकार परिषद
किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला.
किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे. त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.