VIDEO : थोड्याच वेळात Kirit Somaiya यांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल येणार
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आता थोड्याच वेळात सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल येणार आहे.
सेव्ह विक्रांत मोहिमेंतर्गत गोळा केलेला कोणताही निधी राजभवनाला मिळाला नाही. त्यामुळे हा पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्याचे स्पष्ट उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आता थोड्याच वेळात सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल येणार आहे.