किसान सभेचं ‘लाल वादळ’ उद्या मुंबईत धडकणार, कोणत्या मागण्यांसाठी लाँग मार्च?

| Updated on: Mar 13, 2023 | 6:19 PM

VIDEO | नाशिकमधून निघालेलं 'लाल वादळ' विधानभवनावर धडकणार... रस्त्यावर शेतमाल फेकत नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च

नाशिक : किसान सभेचं लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग असल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते उद्याच कळणार आहे. दरम्यान, दिंडोशी आणि नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. त्यामुळे उद्या लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी कोण संवाद साधणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Published on: Mar 13, 2023 06:19 PM