Kishori Pednekar | राजकीय लोकांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जातंय, किशोरी पेडणेकर यांचा आरोप
लॉकडाऊनमुळे नुकसान होत असल्याने व्यापारी आंदोलन करत आहेत. त्यावरही महापौरांनी भाष्य केलं. व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. सगळ्यांचंच नुकसान होत आहे. परंतु, अजूनही काही वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.
लॉकडाऊनमुळे नुकसान होत असल्याने व्यापारी आंदोलन करत आहेत. त्यावरही महापौरांनी भाष्य केलं. व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. सगळ्यांचंच नुकसान होत आहे. परंतु, अजूनही काही वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. दोन तीन दिवसात यावर काही तरी निर्णय होऊ शकतो, असे संकेत देतानाच काही राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जात आहे. व्यापारी संघटनांच्या मागे वेगळे चेहरे आहेत. दबाव तंत्रात लोकांच्या जीवाची पर्वा केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. ते चांगला मार्ग काढतील, अशी आशा आहे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.