Kishori Pednekar | कंगनाला पद्मश्री देऊन देशाचा अपमान : किशोरी पेडणेकर

| Updated on: Nov 15, 2021 | 6:27 PM

किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. त्या म्हणाल्या, आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणे हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करून विषय संपवा, अशी मागणी करत त्यांनी एकाचवेळी कंगना राणावत आणि केंद्र सरकारवर शरसंधान साधले. कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात यायला बघते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येथे कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी काय करते, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला फटकारले. सोबतच बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करावे असा प्रस्ताव आहे. त्याच्यावर आणि त्यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही दिले.

पेडणेकर यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. त्या म्हणाल्या, आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणे हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे.

Nawab Malik | अमरावतीत दंगली घडवण्यासाठी मुंबईतून पैसे आले, एका आमदाराने पैसे वाटले, मलिकांचा दावा
Ashish Shelar | माझ्या फोटोचा रझा अकादमीच्या विषयाशी काय संबंध ?