Video : नवनीत राणांना शूटींगची परवानगी दिली कशी? सेनेचा रुग्णालय प्रशासनाला सवाल…

| Updated on: May 09, 2022 | 1:33 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) एमआरआय चाचणी करण्यात आली. एमआरआय चाचणीचे राणा यांचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) आणि किशोरी पेडणेकर यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. नवनीत राणा यांचं एमआयआर सुरू असताना फोटोग्राफर आत गेलेच कसे? एकावेळी तीन […]

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) एमआरआय चाचणी करण्यात आली. एमआरआय चाचणीचे राणा यांचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) आणि किशोरी पेडणेकर यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. नवनीत राणा यांचं एमआयआर सुरू असताना फोटोग्राफर आत गेलेच कसे? एकावेळी तीन चार लोक एमआरआय रुममध्ये आत गेलेच कसे? एमआयआर रुममध्ये मोबाईल गेलाच कसा? मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, मग या वस्तू गेल्याच कशा? या टेस्टचं शुटिंग झालंच कसं? एमआयआर खरंच झाला होता का? की फक्त ड्रामा होता? असा सवाल किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी केला. यावेळी त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. तसेच आम्हाला एमआरआय रिपोर्टची कॉपी द्या, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असं सांगतानाच तुमच्यावर काही दबवा होता का? होता तर तुम्ही पोलिसात तक्रार द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

नागपुरात सिलेंडर स्फोट झाल्याने झोपडपट्टीमध्ये भीषण आग
Video : एमआरआय कक्षात फोटोग्राफी करणं चुकीचंच- मनिषा कायंदे