Special Report | जनरल बिपीन रावत ते ‘बीरा’…!
बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी रावत हे एक होते.
मुंबई : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात (Helicopter Accident) अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी रावत हे एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते.