कोकणातील प्रसिद्ध दशावतार लोककलावंत सुधीर कलिंगण यांचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन

| Updated on: Feb 07, 2022 | 9:39 AM

कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलंय.  आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालंय. 

कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलंय.  आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालंय.  कलिंगण यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  कलिंगण यांच्या निधनामुळं दशावतार क्षेत्रातील कलाकार व रसिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  सुधिर कलिंगण म्हणजे दशावतार क्षेत्राचा हिरा होते. सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य, तसेच दशावतार चालक मालक संघाचे सचिव होते.

OBC ना 50 टक्के मर्यादेतच राजकीय आरक्षण द्या, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
लता मंगेशकर यांच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर प्रभुकुंजवर घेऊन जाणार