‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा अन् उलट सुलट चर्चेला पूर्णविराम

| Updated on: May 19, 2023 | 4:28 PM

VIDEO | आपला राजीनामा सत्तांतरानंतर ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच, नेमकं काय म्हणाले 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरही करण्यात आला आहे. मात्र गोकुळचं चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना हा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. आपला राजीनामा सत्तांतरानंतर ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच आहे.. शिवाय गोकुळचे लेखापरीक्षण हे राजकीय हेतून केलं जात असून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलय.. त्यामुळे या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात आपण जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटी वरून 3420 कोटी रुपयांवर उलाढाल झाली असून 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसंच दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना दूध खरेदीसाठी सात वेळा दूध खरेदी दरात वाढ देखील केली आहे. मात्र जवळपास 20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळचे चाचणी लेखा परीक्षणात कोणतेही तथ्य नसून राजकीय द्वेशापोटी विरोधक हे करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 19, 2023 04:28 PM
महाराष्टातले भाजप नेते कमी पडले? फडणवीस यांना का लागली मोठ्या नेत्यांची गरज? रोहित पवार म्हणतात…
जागावाटपावरून मविआत वादंग, संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावर एकनाथ खडसे म्हणतात…