‘गोकुळ’ आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा; 22 हजार लिटरची पहिली खेप रवाना

| Updated on: Dec 10, 2021 | 11:08 AM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार आता नौदलाला दुधाचा पुरवठा करण्यात येईल.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार आता नौदलाला दुधाचा पुरवठा करण्यात येईल. दरम्यान आज टेट्रापॅक दुधाची 22 हजार लिटरची पहिली फेरी कारवारला पाठवण्यात आली आहे. या टेट्रापॅक दुधाचे वैशिष्ट म्हणजे हे सामान्य तापमानात 180 दिवस खराब होत नाही. यामुळे भारतीय नौदलातील जवानांना आता सहज दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

Published on: Dec 10, 2021 11:07 AM
देशात ओमिक्रॉनचा धोका; आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण 31 जानेवारीपर्यंत स्थगित
Chhotu Bhoyar | मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती : छोटू भोयर