Kolhapur Flood | कोल्हापुरात दिलासादायक चित्र, पंचगंगेच्या पाणीपातळीत घट
महाराष्ट्रात कोल्हापुरासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोल्हापुरासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही घट होत आहे. पंचगंगेची सध्याची पाणीपातळी 54 फुटांवर गेली आहे. सकाळपासून येथे पाणी दीड फुटांनी घटलं आहे. सखल भागातही पाणी कमी होत आहे.