Kolhapur| Ganpati Visarjan 2021| कोल्हापुरात 21 फुटी बाप्पाचं विसर्जन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं.
कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं. शिवाजी तरुण मंडळाने पहाटेच शिवाजी चौकात 21 फुटी गणेशमूर्ती आणून ठेवली आहे.मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत मूर्ती गणेश विसर्जनासाठी न्यायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले असून काही वेळ थोडासा तणाव निर्माण झाला होता. फुलांच्या उधळणीत बाप्पा बाहेर पडले असून थोड्याच वेळात विसर्जन होईल अशी माहिती आहे. विसर्जन मार्गावरील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.