St kolhapur : बऱ्याच दिवसांनी कोल्हापुरात लालपरी धावली, काही ठिकाणी मात्र संप अजूनही सुरू
कोल्हापूर एसटी आगारातून काही बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापुरातून आणखीही काही बसेस धावणार आहेत. अनेक ठिकाणी मात्र अजूनही संप मागे घेतलेला नाही.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर होते. त्यानंतर मोठी पगारवाढ जाहीर झाली. त्यानंतरही काही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम होते. त्यामुळे सर्वसामान्यांना लालपरीची प्रतीक्षा कायम होती. पण काही ठिकाणी ती प्रीक्षा संपली आहे. कोल्हापूर एसटी आगारातून काही बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापुरातून आणखीही काही बसेस धावणार आहेत. अनेक ठिकाणी मात्र अजूनही संप मागे घेतलेला नाही. कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. परिवहन मंत्री यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचं आवाहन केलंय सर्वसामान्यांंना वेठीस धरू नका असं परब म्हणालेत.
Published on: Nov 26, 2021 03:39 PM