Kolhapur मध्ये 12 एप्रिलला होणार पोटनिवडणूक आणि 16 एप्रिलला निकाल
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने चार राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय.
मुंबई : आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा (by-Election) कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक आयोगाने (Election Commission) पोडनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता आता राज्यात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने चार राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यात पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.