कोकणातील मच्छीमारांची बोटीच्या डागडुजीला सुरुवात
पावसाची चाहूल लागल्याने कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांची लगबग पहायला मिळतेय. कोकणातीली मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. मच्छिमारी हंगाम अ्ंतिम टप्यात आलाय.
पावसाची चाहूल लागल्याने कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांची लगबग पहायला मिळतेय. कोकणातीली मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. मच्छिमारी हंगाम अ्ंतिम टप्यात आलाय. त्यामुळे सध्या मच्छिमार आपल्या बोटीची डागडुजीची कामे करताना पहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, पाचपंढरी, जयगड, नाटे, गुहागर, मिरकरवाडा बंदरात सध्या बोटींची कामे सुरु आहेत. बोटींच्या रंगरंगोटीपासून ते या बोटींना आच्छादण्याची कामे सुरु आहेत.