बैलगाडीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह उदयनराजेंची कृषी प्रदर्शनात भन्नाट एन्ट्री, बघा VIDEO
कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनात 42 फूट श्रीरामाच होर्डिंग आणि आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती या प्रदर्शनात आकर्षण ठरत आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट बैलगाडीवरून भन्नाट एन्ट्री घेतली
कराड, १७ जानेवारी २०२४ : कराड येथील शिवाजी स्टेडियमवर आजपासून कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शन सुरु होत आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाच उदघाटन होणार आहे. या प्रदर्शनात 11 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर प्रदर्शनात जवळपास 400 स्टॉल सहभागी झाले आहेत. 42 फूट श्रीरामाच होर्डिंग आणि आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती या प्रदर्शनात आकर्षण ठरत आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट बैलगाडीवरून भन्नाट एन्ट्री घेतली. या महोत्सवात देशातील सर्वात उंच आणि देखणा असा सोन्या बैल, देशातील सर्वांत उंच बैलासोबतच भारतातील सर्वांत लहान पुंगनूर जातीची अडीच फूट उंचीची गाय, दोन टन वजनाचा रेडा, एक फूट लांबीची मिरची, दीड फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल पाहायला मिळतील. 36 देशांतील पिकांचे नमुनेही ठेवण्यात आले आहे.