मुंबईत कुठं बांधली चांद्रयान ३ ची हंडी? अनोख्या स्टाईलनं दहीहंडीचा सण साजरा
VIDEO | गेल्या 40 वर्षांपासून मुंबईतील वरळी बीडीडी चाळ क्रमांक 119 / 120 येथे श्री अंजनेशवर रहिवासी सेवा मंडळातर्फे आगळा-वेगळा दहीहंडी उत्सव साजरा होतो आहे. हा सण कुणाशी प्रतिस्पर्धा नव्हे तर उत्सव, आनंदाने साजरा करण्याचे मंडळाने केले आवाहन
मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | वरळी बीडीडी चाळ क्रमांक 119 / 120 येथे श्री अंजनेशवर रहिवासी सेवा मंडळातर्फे आगळा-वेगळा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणी दही हंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. या भागात राहणाऱ्या लहान मुला-मुलींना काहीतरी वेगळं आणि थोडं ज्ञानात भर टाकणारी काहीतरी सजावट करून या ठिकाणी दहीहंडीला वेगळं स्वरूप देण्यात येत असते. यंदा येथे चंद्रयान ३ ची प्रतिकृती बनवून त्यामध्ये दही हंडी बांधण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गोविंदा पथकांनी इथे प्रयत्न करून इथली चंद्रयानची प्रतिकृती असलेली दही हंडी साकारली यासोबतच इतर तीन लहान मोठी दही हंड्या त्यांनी फोडल्या. तर हा सण कुणाशी प्रतिस्पर्धा म्हणून नव्हे तर उत्सव, आनंदाने साजरा करा त्याच बरोबर गोविंदा विशेष म्हणजे लहान गोविंदांची काळजी घेण्याचे आवाहन श्री अंजनेशवर रहिवासी सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.