Krishnakumar Patil : ‘ईदगाह पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश नाही’

| Updated on: Jan 07, 2022 | 6:01 PM

ईदगाह हा धडा मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यातून घेण्यात आला असून अभ्यास मंडळानं जी उद्दिष्टं समोर ठेवलीत, त्या अनुषंगानंच तो पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचं बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील (Krishnakumar Patil) यांनी सांगितलं.

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातला ईदगाह हा धडा वगळावा अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केलीय. तशाप्रकारचं निवेदनही त्यांनी मंडळाला दिलंय. यातील मजकूर आक्षेपार्ह असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र हा धडा मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यातून घेण्यात आला असून अभ्यास मंडळानं जी उद्दिष्टं समोर ठेवलीत, त्या अनुषंगानंच तो पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचं बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील (Krishnakumar Patil) यांनी सांगितलं. पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश नाही, असंही ते म्हणाले.

Published on: Jan 07, 2022 05:59 PM