विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? भाजपच्या कोणत्या नेत्यानं दिली टीप? हितेंद्र ठाकूरांचं सनसनाटी वक्तव्य
विरारमध्ये उघडकीस आलेल्या कॅशकांड प्रकरणावरून हितेंद्र ठाकूर यांनी खळबळ उडवणारं वक्तव्य केलंय. भाजपच्या नेत्यानेच विनोद तावडे पैशांचं वाटप करत असल्याची माहिती दिली, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. तर संजय राऊतांनी यांनीही अतंर्गत षडयंत्र असल्याचे म्हटले.
विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे ५ कोटी रूपये घेऊन येत असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली असल्याचे म्हणत वबिआच्या हितेंद्र ठाकूर यांनी सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर संजय राऊत यांनी याची गृहखात्याला माहिती असेल असा उल्लेख केला. ज्यांनी ५ कोटी रूपयांचा आरोप केला आणि पाच तास त्यांना हॉटेलमध्ये अडवून ठेवलं त्याच हितेंद्र ठाकूर यांनी ही माहिती भाजपच्या नेत्यानी पुरवली आणि त्यानंतर संजय राऊतांनी विनोद तावडेंना पकडून देण्याचं काम भाजपच्याच काही लोकांचं असल्याचे म्हटले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधला. हा प्रकार भाजप आणि महायुतीचा नोट जिहाद आहे का? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप विनोद तावडेंवर झाला. या हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंच्या बॅगा जप्त करत नोटाही भिरकावल्यात. पण या पैशांशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले. तर भाजपने या घटनेला मीडिया मॅनेज करून विनोद तावडेंची बदनामी केल्याचे म्हटलेय.