‘ते वक्तव्य बरोबर होतं..’, कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल, राऊतांकडून ‘तो’ VIDEO ट्वीट
कॉमेडीयन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटल्यानंतर आता अजित पवारांचा देखील जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय राऊतांनीच हा व्हिडीओ ट्वीट केल्याचे पाहायला मिळत आहे
कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यानंतर आता अजित पवार यांचा जुना व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्वीट केलाय. दरम्यान, शिवसेनेच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख गद्दार असा केला होता. तर अजित पवार म्हणाले तेच मी म्हणालो, असं कुणाल कामराकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान, यावरून देखील अजित पवार यांनी खुलासा देत स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधात असताना माझं ते वक्तव्य बरोबर होतं. पण आता तसं म्हणणं चुकीचं ठरेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ‘गद्दारी करून 50 खोके एकदम ओके. शेमड्या पोरांना सुद्धा आता 50 खोके कळायला लागले आहेत. सायरन वाजला की लोक म्हणतात ते 50 खोकेवाला चालला आहे. बघा तो गद्दार चालला आहे. असं मी म्हणत नाही, लोक म्हणतात.’ असं अजित पवार आपल्या भाषणात बोलताना दिसताय. तर यावरून गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं की, कुणाल कामरा याने काहीही म्हंटलं तरी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अशी टीका करणं योग्य नाही.