Mohit Kamboj : कामराच्या स्टुडिओची तोडफोड अन् मोहित कंबोज म्हणाले, ‘अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है दोस्त, पिक्चर तो अभी…’

| Updated on: Mar 24, 2025 | 3:38 PM

'अभी तो सिर्फ स्टुडीओ टूटा है... पिक्चर तो अभी बाकी है दोस्त..', असं म्हणत मोहित कंबोज यांनी तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक केलेत. बघा काय केलं ट्वीट?

मुंबईतील ज्या स्टुडिओमध्ये कॉमेडियन कुणाल कामराचा कार्यक्रम द हॅबिटॅट स्टुडिओ येथे रेकॉर्ड करण्यात आला होता. तो स्टुडिओ शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याच स्टुडिओमध्ये कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. कामरा याने शिंदे यांना गद्दार म्हटले होते. यासह शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्या राजकीय जीवनाचीही खिल्ली उडवली. एका कॉमेडी शो दरम्यान, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल विडंबनात्मक भाष्य केले. यादरम्यान, कामराने एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हाच्या घटनेचा उल्लेख कामराने केला. कुणाल कामरा म्हणाला की, शिवसेना भाजपमधून सर्वात आधी बाहेर पडली. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडली. एका मतदाराला ९ बटणे देण्यात आली. म्हणून सगळे गोंधळले… यावरूनच शिवसेनेची शिवसेना आक्रमक झाली असताना भाजप नेते आणि आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत येणारे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनीही ट्वीट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक केले.

Published on: Mar 24, 2025 03:37 PM
Santosh Deshmukh Case : अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
Kunal Kamra Updates : कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार