Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, ‘दुःखात सहभागी अन्…’
कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात असल्याची घोषणा त्यांनी केली.
मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघाताच्या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्ब्ल ४९ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी साधारण ६० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी साडे दहा वाजता एक ट्वीट करून त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. ‘कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत’, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.