धक्कादायक! शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा जीव टांगणीला; सफाई कर्मचाऱ्यांकडून देखरेख सुरू

| Updated on: Aug 25, 2024 | 3:36 PM

बदलापूर येथील शासकीय रुग्णालयात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बदलापूर येथील शासकीय रुग्णालयातील दुरावस्थेची गंभीर परिस्थितीसमोर आली असून येथील आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर असल्याचे पाहायला मिळाले. महिला नर्स नसल्यामुळे तेथील सफाई कर्मचारीच गर्भवती महिलांना, इतर महिला रुग्णांची देखभाल करत आहे,

गेल्या १६ ऑगस्ट रोजी एक चिमुकली या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी आली होती, मात्र तिला उपचार न देण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. यानंतर याच प्रकरणाचा तपास घेण्यासाठी टीव्ही ९ मराठी थेट या रूग्णालयातील व्यवस्था जाणून घेण्यासाठी दाखल झाली. बदलापूर शासकीय रुग्णालयात अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे पीडित चिमुकलीचया कुटुंबाला अनेक ठिकाणी फिरावे लागले. रुग्णालयात नर्स आणि डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे रुग्णालयातील सफाई कर्मचारीच रुग्णांची देखरेख करत असल्याचे पाहायला मिळाले. यासर्व धक्कादायक प्रकारामुळे बदलापूर येथील या शासकीय रूग्णालयातील रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. हा सफाई कर्मचारी रूग्णांची ड्रेसिंग करण्यापासून ते रुग्णाचे सलाईन काढण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सर्वात धक्कादायक प्रकार ‘टीव्ही ९ मराठी’ला पाहायला मिळाला. सध्या या रूग्णालयात ५० बेडची क्षमता आहे. या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले नसल्याने ३० बेडच रुग्णालयात आहे. यापेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात आल्यास त्यांना जमिनीवरच गादी टाकून त्यावर त्यांचे उपचार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 25, 2024 03:36 PM