‘लाडक्या बहिणीं’चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स, राजधानीत चर्चा तर होणारच
संपूर्ण राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजधानी दिल्लीतही महाराष्ट्रातील एका योजनेचा बोलबाला होताना दिसतोय. ती जाहिरात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना...
महाराष्ट्र राज्य सरकारची दिल्लीत जाहिरात झळकल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीतल्या बस स्टॉपवर राज्य सरकारची जाहिरात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात थेट राजधानी दिल्लीत चर्चेत आहे. दिल्लीतील कस्तुरबा गांधी या मार्गावरील प्रत्येक बस स्टॉपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जाहिरात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. बस स्टॉपवरील जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही फोटो लावण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गाजत असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या जाहिरातीचा डंका थेट आता दिल्लीत पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर ‘अपनी सरकार, लाडली सरकार’, अशी टॅगलाईन यावर असून महाराष्ट्र सरकारचे अप्रत्यक्षपणे कौतुक करण्यात आल्याचे या दिल्लीतील बॅनरवरून दिसतेय. बघा व्हिडीओ…