Ladki Bahin Yojana : कोणत्या ‘लाडक्या बहिणीं’चे पैसे बंद होणार? आदिती तटकरेंनी मुद्दा केला क्लिअर
महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात निवडणुकीत जिंकल्यानंतर लाभार्थी लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये दिले जाणार असे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याने आता लाडकी बहीण योजनेचे काय होणार? यावरून तर्क वितर्क लावले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मतं विकत घ्यायचे होते तेव्हा निकष का लावले नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तर ज्या पुरूषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतला. अशांची चौकशी होईल असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले. निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे साडे सात हजार रूपये सरकारने अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. तर निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी १५०० रूपयांचे २१०० रूपये करण्यात येणार अशी घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी महायुतीला २३० जागांवर नेलं. मात्र सरकार येताच निकष आणि अर्जाची छाननीवरून चर्चा सुरू झाली. यावरून माजी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या अर्जांची कोणतीही छाननी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी संबंधित तक्रार येईल तेव्हाच छाननीचा विचार होईल असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय काय म्हटलं?