Ladki Bahin Yojana : महिलांनो… अजूनही वेळ गेलेली नाही, ‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठी माहिती

| Updated on: Sep 27, 2024 | 11:59 AM

महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.

राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. लाडकी बहीणसाठी अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबरपर्यत वाढण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. २४ सप्टेंबरपर्यंत २.४ कोटी लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ही ऑगस्ट अखेरपर्यंत होती. राज्यात महायुती सरकारने महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, वयवर्ष २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जात आहे. मात्र या योजनेत पात्र ठरण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

Published on: Sep 27, 2024 11:59 AM