Ladki Bahin Yojana : महिलांनो… लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून पैस घेतले? डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी अन् होणार वसुली?

| Updated on: Oct 18, 2024 | 10:56 AM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला, अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत. त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Oct 18, 2024 10:55 AM
Salman Khan threat : लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला पुन्हा धमकी, ‘…अन्यथा बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल’
मनोज जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा