Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नी कोणाला निवडलं? 1500 देणाऱ्या जुन्या भावांना की 3 हजारांचा वायदा करणाऱ्यांना? कौल महायुती की मविआ?

| Updated on: Nov 22, 2024 | 10:40 AM

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांगलाच प्रचार झाला. अशातच यंदा मतादानाची वाढती टक्केवारी बघता लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार, असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे मतांचा टक्का यंदाच्या निवडणुकीत वाढल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत. महाराष्ट्रात मतांची टक्केवारी वाढली आहे. मतांचा वाढलेला टक्का हा लाडक्या बहिणींचा असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात एकूण मतदार ९ कोटी ५३ लाख होते. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख तर महिला ४ कोटी ६० लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात एकूण मतदान हे ६२. ०२ टक्के इतकं झालं आहे. म्हणजेच ६ कोटी २१ लाख मतदारांनी मतदान केलं. २०१९ मध्ये ६१. ४ टक्के मतदान झालं होतं म्हणजेच यंदा ३. ६ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. सरकारचा प्रचार लाडक्या बहिणीवरूनच केंद्रीत झाला होता. तर सरकारमध्ये आल्यावर १५०० रूपयांचे २१०० रूपये करणार अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. जसा २१०० रूपयांचा वायदा महायुतीने केला होता तसाच वायदा महाविकास आघाडीने केला असून महालक्ष्मी योजनेद्वारे महिन्याला ३००० रूपये देण्याचा केला. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी पसंती आधीच्या भावांना दिली की नवा वायदा करणाऱ्यांना दिली. हे निकालानंतरच समोर येणार आहे.

Published on: Nov 22, 2024 10:38 AM
Gautam Adani : उद्योगपती गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
Assembly Election 2024 : …तर महाराष्ट्रात पुन्हा 2019 प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागणार? निकालानंतर सत्तेसाठी नेत्यांच्या हाती फक्त 48 तास अन्…