LadKi Bahin Yojana : निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार? बघा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

| Updated on: Oct 25, 2024 | 5:05 PM

'विरोधकांनी सांगितले ज्या योजना सुरू आहेत त्या बंद पाडू, आमचे सरकार आले तर या योजनांची चौकशी करू, त्यांना जनता साथ देणार नाही. त्यामुळे त्यांचं सरकार येणार नाही. त्यांना ही संधी मिळणार नाही ', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Follow us on

राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून केल्यानंतर विरोधक मात्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी आम्ही सर्व निर्णय रद्द करू, असं म्हटलं होतं. त्यामुळे होणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना महाविकास आघाडीला भारी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाष्य करत ही योजना बंद होणार नसल्याचा शब्द लाडक्या बहिणींना दिलाय. ते म्हणाले, ‘सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी महाविकास आघाडीने खोडा घातला. ते हायकोर्टात गेले तिथे त्यांना कोर्टानं चपराक दिली. त्यानंतर काँग्रेसचा अनिल वडपल्लीवार नावाचा व्यक्ती नागपूर कोर्टात गेला. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना विरोधकांच्या पोटात सलतेय आणि त्यांच्या डोळ्यात खुपतेय’. पुढे ते असेही म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींनी ठरवलंय, या लाडक्या भावांना पुन्हा सरकारमध्ये आणायचं. आमच्या या योजना असतील जसं की, लाडकी बहिणी योजना…कोणी किती मायका लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही… ही योजना वाढत जाईल, त्याचे पैसेही वाढत जातील. मात्र जे या योजना बंद पडतील त्यांना लोक घरात बसवतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.