Nashik | नाशकात पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे पोलीस आयुक्तलयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
पोलीस तक्रार घेत नसल्याने महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्त कार्यलया बाहेर पेट्रोल टाकून या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. श्रमिक सेना पदाधिकारी यांच्या कडून मारहाण झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पोलीस तक्रार घेत नसल्याने महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्त कार्यलया बाहेर पेट्रोल टाकून या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. श्रमिक सेना पदाधिकारी यांच्या कडून मारहाण झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. राजलक्ष्मी पिल्ले असे या आत्मदहन करणाऱ्या महिलेच नाव आहे. इंदिरा नगर पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार द्यायला जाऊनही तक्रार दाखल करून न घेतल्याचा आरोप ही या महिलेने केला आहे. आत्मदहन करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला राजलक्ष्मी पिल्ले या युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. राजलक्ष्मी यांनी आपल्या पतीसोबत नाशिक पोलीस आयुक्तलयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून आपल्याला मारहाण झाली. याबाबत आपण इंदिरा नगर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करण्यासाठी जावूनही पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही, असा आरोप राजलक्ष्मी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाबाहेर पतीसोबत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.