Priyanka Gandhi | तपासासाठी अजय मिश्रांचा राजीनामा घेणं गरजेचं, प्रियांका गांधींची मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूरला जात पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
खीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूरला जात पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी केलीय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी आम्ही लखीमपूर खीरीमध्ये ज्या परिवारातील सदस्यांना गाडीखाली चिरडलं गेलं. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते दोन मागण्या करत आहेत. एक म्हणजे त्यांना न्याय हवाय. ज्या व्यक्तीने ही हत्या केलीय त्याला शिक्षा मिळायला हवी. ज्या वक्तीने हत्या केलीय त्याचे वडील देशाचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे जोपर्यंत ती व्यक्ती पदावर आहेत तोपर्यंत योग्य तपास आणि न्याय मिळू शकत नाही. ही बाब आम्ही राष्ट्रपतींना सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले.